पटवर्धनांचे कुळाचार
जेंव्हा आपल्या घरी काही मंगल कार्य होते तेंव्हा ते कार्य झाल्यावर साधारण वर्षाचे आत कुलस्वामिनीचे दर्शनास/सेवेस जावे. तसेच घरात दु:खद घटना घडल्यावरही वर्षभरात दर्शनास/सेवेस जावे.
कोणत्याही शुभ कार्या नंतर बोडण घालतात. काहीजणानकडे कालवण्याचे तर काहीजणानकडे सवाष्ण जेवण घालण्याचे बोडण असते. राहून गेलेली बोडणे एकत्रित एका वेळी घालता येतात.
सरदार घराण्यातील पटवर्धनांच्या कडे ५ दिवसांचा गणेशोत्सव असतो. गणपती किती दिवस बसवावा हे आपापल्या घरातील परंपरे प्रमाणे करावे.